आपले श्री. विकास चितळे आणि श्री. सुनिल चितळे यांनी या कुटुंबियांना सिझॊफ्रेनिया अवेअरनेस असॊसिएशन अनुक्रमे रू. १००००/- रॊख व चार संगणक यंञे भेट दिली. या असॊसिएशनला आपणासही मदत करावयाची असेल तर त्यांच्याकडून करसवलीतीचा दाखला मिळू शकतॊ.
त्याच प्रमाणे आपले जेष्ठ सभासद श्री. एस. बि. चितळे यांनाही एका गावात पिण्याच्या
पुणे येथील पर्वती विभागातील साने गुरूजी तरूण मिञ मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या चितळे परिवारातील श्री . संजय चितऴे यांनी त्यांच्या मातोश्री ( कै. मंगल चितळे आणि वडिल राजाभाऊ (नृसिंह भास्कर) चितळे यांच्या स्मारणर्थ एक आत्याधुनिक रूग्णवाहिका दान केली.
ही रूग्णवाहिका लोकापर्ण सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. नितीन चंद्रकात देसाई तसेच चितळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
श्रीमती सुमित जांभेकर यांच्या पुढाकाराने चिपळुण येथे १९८८ मध्ये मतिमंद मुलांनासाठी शाळा सुरू झाली. त्यास चिपळुण येथील आपले सभासद श्री. प्रदिप मोने यांनी रू ५०,००,०० /- (रू पाच लाख ) देणगी दिली.
याच शाऴेमध्ये वय वर्ष १८ च्या पुढील मुलांना उद्दोग करण्याची चालना देण्याच्या उद्देशाने जयदिप मोने उदयोग केंद्र चालू करण्यात आल
पुणे येथील पर्वती विभागातील साने गुरूजी तरूण मि
आपल्या चितऴे फौंडेशनने रोटरी क्लब टिळक रोड पुणे यांचे साहाय्याने अंतर्गत कोकणातील दूर्गम भागात दोन शाळांमधॆ दि. २१ ६ २०१४ रोजी प्रत्येक शाळॆत एक एल.सी.डी. प्रोजेक्टर, बॅटरी बॅक अप ४ तासांच्यासाठी इन्वर्टर, तसेच स्पिकर्स, किबोर्ड, माउस, सीपीयु, वगैरॆ साधनॆ भॆट दिली आहॆत. तसॆच याचॆ प्राथमिक वापरण्याचे शिक्षण तज्ञ्ज इंजिनिअर्सद्वारॆ तॆथील शिक्षक वर्गाना दिलॆ. .
ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये बरेचदा आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध नसतो. अनॆकदा एकाच शिक्षकावर अनॆक विषय शिकविण्याची वॆळ यॆतॆ. यामुळॆ अध्यापनाचा दर्जा तर खालवतोच. विद्यार्थीपण गुणवत्तापुर्ण शिक्षणापासून वंचित राहतात. अनुत्तीर्ण होतात. शाळा सोडतात. हॆ टाळण्यासाठी संगणकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आवश्यक अभ्यासक्रम दर्जॆदारपणॆ विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम राबविण्याची योजना आहे.
सदर कार्यात आर्थिक सहाय्यता अंतर्गत आपल्या फौंडेशनच्या सभासद सौ. अनुराधा मुकुंद चितळे यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ रू. ५०, ००० ची मदत केली.हा दो्न्ही शाळांमधे दिलेला उपक्रम अंदाजे रू. २,००,००० पर्यंत झाला आहे.
गुरूवार दि. २ आँक्टोबर रोजी आर . सी काळे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय , पेढे - परशुराम , ता . चिपळूण , जि . रत्नागिरी या शाळेत मा .मुख्याध्यपक , रामप्रसाद कान्हेरे सर यांच्या अध्यक्षतेखाली १६ गरजू मुलींना चष्मे वितरण व 'वाचाल तर वाचाल' या उपक्रमानुसार पुस्तक प्रदान कार्यक्रम पार पडला. चितळे फौंडेशनच्या वतीने श्री . उदय चितळे व श्री . विजय चितळे व श्री . अतुल चितळे कार्यक्रमास उपस्थित होते .
फौंडेशनच्या वतीने श्री . उदय चितळे मनोगत व्यक्त केले व ‘ वाचाल तर वाचाल ‘ ही संकल्पना मांडली व त्याला शाळेतून चांगला प्रतिसाद मिळाला. गरजु मुलींना चष्मे वितरण श्री . अतुल चितळे व श्री . विनय चितळे यांच्या हस्ते पार पडले, व पुस्तकाचे श्री . उदय चितळे यांच्या हस्ते झाले. शाळा मुख्याध्यपकांनी चितळे फौंडेशनच्या कार्याचा गुणगौरव केला, व आपल्या सर्वांना धन्यवाद दिले, व चितळे फौंडेशनच्या पुढील कार्यास शुभेच्छा घेऊन आम्ही पेढे - परशुराम शाळेचा निरोप घेतला .
त्या मृत्युलोकात जनकल्याणार्थ प्रत्यक्ष देव जरी अवतरू शकत नसला तरी तो त्यासाठी आपले देवदूत पाठवत असतो. हे देवदूत मग त्यांच्या कार्याद्वारे गरजूंचे देव बनतात. आपल्या संस्कृतीत दानाची फार मोठी पंरपरा सांगितली आहे. एका हाताने दिलेले दान दु्स-या हाताला कळू नये इतका मोठा विचार त्यामागे आहे. माञ आज नको त्या गोष्टीला संवग व नको तेवढी प्रसिद्धी मिळत असताना, या समाजामध्ये काही चांगले घडते का? असा प्रश्न पडतो.
त्याने चांगली कार्यही झाकाळली जातात म्हणूनच आम्ही या ‘ अनुबंध ' च्या माध्यामातून अशा आदर्श सामाजिक कार्याचा व ‘ देवदुतांचा ’परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बांदिलकी या सदरात जाणीवपूर्वक केवळ चितळे परिवारातील सामाजिक कार्याचा उल्लेख करीत आहोत,करणार आहोत.कारण त्यातून प्रेरणा घेऊन इतरही त्या दिशेने प्रेरीत होतील हा त्या मागील उद्देश आहे.
श्री. शशीकांत बळवंत चितळे संचालित सुराग ट्रस्ट हे सामाजिक बांधिलकी मानून समााजासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवीत असते. कै. रामंचद्र गणेश चितळे व श्रीमती सुमती रामंचद्र चितळे हे दोघेही समाजातल्या गरीब व होतकरू मुलांना / मुलींना मदत करण्यास अग्रेसर होते. लहान मुलांना मदत करून त्यांचे शिक्षण व्हावे, त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि ते स्वावलंबी होउन स्वताःच्या पायावर छान उभे रहावे, या इच्छेने त्यांनी सुराग ट्रस्ट स्थापन केले (श्रीमती सुमती रामंचद्र चितळे ).नुकताच या ट्रस्ट ने एप्रिल २०१३ या महिन्यात बदलापुर येथील सत्कर्म आश्रम या गरीब मुलांंच्या वस्तीगृहास ५०० लिटर क्षमतेचा सौर उर्जा शक्ति वर चालणारे गरम पाण्याचे वाँटर हिटर दान केले. त्यामुऴे वस्तीगृहातील मुलांना गरम पाण्याने आंघोळ करता येते व आश्रमाच्या विजेच्या बिलात मोठ्या प्रमाणात येणारा खर्च कमी झाला. हेही नसे थोडके .
आपल्या समाजात आपआपसात सहभाग फारच कमी असतॊ. ज्या कारणाने आपला म्हणावा तसा उत्कर्ष हॊत नाही. असा सर्व साधारण अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याच वैचारिक अदान - प्रदानातील कमतरतेचा धागा पकडून आपल्या पुण्यातील काही सभासदांनी श्री विंध्यावासिनी मंडळाची स्थापना केली. अर्थात ही चितळे फौंडेशनची शाखा आहे.
त्या शाखेची तीन वर्ष आम्ही नुसते वैचारिक अदान प्रदान न करता सभांसदानी कुटुंबासह - चिपळूण - ठाणॆ – श्रीवर्धन येथे फौंडेशनच्या सभासंदाशी संवाद साधला. त्या बाबत तसा उल्लेख मागील काही ' अनुंबध ' या गृहप्रञिकेत केला हॊताच.
तर त्या धाग्याला धरून आम्ही काहीजण इंदौर येथे गेलो होतो. दोन दिवस तेथील सभासंदाशी भेट घेतली. फौंडेशनच्या सीमा वाढवायच्या दृष्ठिने चर्चा केली. स्नेह वाढवण्यासाठी अर्थातच स्नेह भोजनाचा कार्यक्रम होताच, त्यामुळे भगिनी इतक्या जवळ आल्या की राञीचे १० कधी वाजले कळालेच नाही. श्री. अशोक राव आजारी होते पण त्यांनाही श्री. यशंवतराव यांच्याशी फौंडेशनच्या कार्याबद्दल कशी वाढ करता येईल याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबासह चर्चा केली.
तेथे ही श्री विंध्यावासिनी मंडळाची स्थापना झाली आहे. श्री. विजयराव व श्री. भरतराव यांनी घोषणाच केली असे नव्हे , तर त्याच वेळी तीन लाईफ मेंबर्स चितळे फौंडेशनला दिले. त्यासाठी सर्व इंदौरवासियांचे आम्ही अभिनंदन करतो आणि तसेच भविष्यात योगदान मिळेलच अशी खाञी करतो.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.