चितळे फाऊंडेशन ही वेबसाईट एका घराण्याचा इतिहास नाही तर चितळे परिवारच्या विस्तृत वाढीचा इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या इतिहास लेखनाची सुरूवात साताराचे रा. दत्तात्रय रामचंद्र चितळे व रा. विष्णु चितळे या उभयतांनी हस्तपत्रक छापून केली. कुलाची संघटना हेच मुख्य उदिष्ट होते. याप्रमाणे कै. डॉ. भजेकर यांनी याबाबत प्रयत्न केले होते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे रा. सीताराम ञ्यंबक चितळे कुलासंबंधी माहिती गाेळा केली होती. आधुनिक तंञज्ञान विकसित होत असताना सन १९३७ साली नागपूर येथील कै. वासुदेव लक्ष्मण चितळे यांच्या संपादकत्वाखाली पहिला कुलवृत्तांत प्रसिध्द झाला.
कुलाची संघटना हेच मुख्य उदिष्ट हाेते. याप्रमाणे कै. डॉ. भजेकर यांनी याबाबत प्रयत्न केले होते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे रा. सीताराम ञ्यंबक चितळे कुलासंबंधी माहीती गाेळा केली होती. आधुनिक तंञज्ञान विकसित होत असताना सन १९३७ साली नागपूर येथील कै. वासुदेव लक्ष्मण चितळे यांच्या संपादकत्वाखाली पहिला कुलवृत्तांत प्रसिध्द झाला. त्याच्या आधार त्यात वाढ वजावट होत असता पुढे पन्नास वर्षानंतर कुलवृत्ताताची दुसरी आवृत्ती पुण्यात श्री. रघुनाथ भास्कर चितळे ( चितळे बंधु) यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सन १९८७ साली प्रसिध्द केली.
त्याच्या आधाराने चितळे परिवाराची विविध ठिकाणची एकुण ४३ घराणी आहे स्थानपरत्वे काही मूळचे चितळे-जोशी-अवळसकर-मोने आडनावांनीही प्रसिध्द आहेत. तर अशा या मागील भूतकालीन इतिहासातून आपण आता २0 व्या शतकालीन म्हणजेच वर्तमानातील जगात वावरत आहोत पण चितळे परिवार म्हणूनच – चितळे फौंडेशनची इ.स २००० मध्ये सुरुवात झाली.
येथे डिसेंबर २००० मध्ये यासंबंधी कुलसंमेलनाचे आयोजन चिपळूण येथील चितळे कुटूंबियानी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केले म्हणजेच चितळे परिवार एकिकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सरकारी परवान्यासाठी इ.स २००४ साली नॅान प्राॅफिट कंपनी म्हणून चितळे फौंडेशन ही कंपनी स्थापन करण्यात आली. चितळे परिवारातील प्रत्येक व्यक्ती ही फौंडेशनची सभासद असणार आहे. फौंडेशन उपक्रमांतर्नत शिक्षण व आरोग्य या विषायांवर भर देते.
सर्व सभासदांशी वार्तालाप व्हावा, वैयक्तिक उपक्रमांची सर्वांना माहिती व्हावी, फौंडेशन सामाजिक उपक्रमांंबाबत काय काय करते याची माहिती व्हावी या व अशा अनेक संबंधीत कामांबाबत सहयोग व्हावा यासाठी 'अनुबंध' या नावे ञैमासिक गृहपञिका प्रकाशित केली जाते. उपक्रमांना आर्थिक साहाय्य म्हणून अजीव सभासद व सर्वसाधारण सभासद अशी नोंदणी केली जाते.
आजपर्यंत सन २०००, २००३, २००६, २००९ व २०१२ अशी पाच कुलसंमेलन यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. तसेच दि. १५ व १६ नोव्हेबंर २०१५ या दिवशी चिपळून येथे महाकुलसंमेलन आयोजित करण्यात आले आहे . श्री देवी विंध्यावासिनी व श्री देव विरेश्वर कृपेने कुलपरिवार जीवनात यशापयश पचवीत आहे . फौंडेशनचे सर्वसाधारण सुमारे एक हजार सभासद झाले आहेत तसेच अजीव सभासद म्हणून ८० जणांची नोंद झाली. त्यांच्या आर्थिक सहभागासोबत काही सदस्य सभासदांनी अगणित अर्थसाहाय्य देऊन समाजाच्या शैक्षणिक व वैद्यकीय कार्यात मोलाचा हातभार लावला आहे.
तर अशा प्रकारे चितळे फोंडेशन ही आपली संस्था अध्यक्ष, सचिव, आणि पाच सहाय्यक संचालक यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालू आहे. चिपळूण, मुंबई, ठाण, नागपूर, नाशिक, इंदौर, पुणे येथे आपले स्थानिक कार्यकर्ते इतर सभासदांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबवित असतात. ' अनुबंध ' या गृहपञिकेत त्यासंबंधीत माहिती सर्वांना कळवली जाते.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.